The LUNCH BOX | MOVIE of UNCONDITIONAL LOVE
The LUNCH BOX | MOVIE of UNCONDITIONAL LOVE

The LUNCH BOX | MOVIE of UNCONDITIONAL LOVE

The LUNCH BOX खूप सुंदर MOVIE आहे. मानवी भावनांच, मानवी जीवनाचं एक सुंदर रूप त्यामध्ये दाखवलं आहे. एका सरकारी office मध्ये काम करणारा एक क्लर्क

ते ही मुंबई शहरामध्ये घर ते ऑफिस हा प्रवास म्हणजे लोकल ,टॅक्सी and office असा त्याचा रूटीन. आपलं काम आणि आपण हेच त्याचं बोअरिंग रूटीन असतो.

एके दिवशी त्याला चुकून कोणाचा तरी डब्बा पार्सल होतो. त्या डब्यातील पदार्थांची चव त्याच्या रोज येणाऱ्या डब्ब्या पेक्षा खूप स्वादिष्ट असते. त्या अनोळखी डब्यात चिठ्ठी मधून

त्या जेवणाची स्तुती इरफान खान करतो. आणि श्याप्रकारे एका डब्यातून चिठ्याचा अनोळखी प्रवास चालू होतो.

त्यावेळी ते दोघेही जीवनाचे विविध पैलू त्यात उलगडत जातात. ती जी डब्बा पाठवायची तीच नाव इला असतं.तिच्या घराच्या वरती एक आजीबाई असते,

त्या दोघी खिडकीतून गप्पा आणि भाजीपाला exchange करत असतं. एकदा त्यांनी त्यांचा नवऱ्याचा एक किस्सा इला ला सांगत की,

आजीबाई चे मिस्टर कोमात आहेत पण त्यांना असं वाटतं की त्यांचा जीव त्या पंख्या मध्ये अडकलेला आहे.

कारण एकदा light गेलेली तेंव्हा तो पंखा बंद होतो, तसा त्यासोबत आजोबांच्या हृदयाचे ठोके पण कमी कमी व्हायला लागतात.आणि डोळे बंद होणार तेवढ्यात लाईट येते

आणि त्यांच्या ह्रदयाची धडधड नॉर्मल चालू होते.

तिचा नवरा ऑफिस मधून आल की जेवण करायचा आणि झोपी जायचा. तिला आतापर्यंत कळलं होत की तिच्या नवऱ्याचा अफेअर चालू आहे. पण ती कोणाला सांगणार आपल्या मनातील दुःख!!!

मग त्या चिठ्ठी मधून त्या अनोळखी क्लर्क ला सांगत असते. आणि तो क्लर्क त्या lunch box मधून येणाऱ्या चिठ्ठी तून आयुष्याच्या प्रवसाची कहाणी एकमेकांना पोहोचवत असे.

विचारांच्या त्या देवाण घेवणी मधून क्लर्क ला त्या लंच बॉक्स पुरवणाऱ्या अनोळखी व्यक्ती विषई प्रेमाच्या भावना निर्माण होतात. कारण त्या क्लर्क च्या चेहर्यावर्ती आता तो आनंद दिसायला लागला होता.

इतके दिवस कोणाशीही हसून न बोलणारा तो आता मनसोक्त आनंदने बोलू लागतो. त्याच्या office मध्ये अलेलाल नवीन trainee ला तो आता कामात व्यवस्थित guide करू लागतो.

म्हंजे त्याचा आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलायला लागलाय. तसाच ती च्या ही आयुष्यात दिसायला लागतो.

जर माणसाजवळ असणाऱ्या जुन्या गोष्टी कोणाला सांगितल्या नाही तर त्या आपल्या आठवणीतून विसरू लागतात. ती जागा ते ठिकाण ते क्षण सगळं विसरून जायला होत.

पण माणसाला जाण्यासाठी सोबत करतात त्या आठवणीच असतात. आठवणीच असतात ज्या माणसाला जीवनात समोर जाण्यास मदत करतात आणि त्या आठवणी जगलेल्या जागेवरती जावून

तो क्षण पुन्हा जाण्याचा आनंद पण आठवणीच देऊ शकतात.

आणि प्रेम जगण्याला सुंदर बनवत. प्रेम माणसाला जगण्यात नवीन बळ देत. प्रेम आयुष्याकडे बघण्याची माणसाची नजर प्रेमळ बनवतो. म्हणून आयुष्यात प्रेम असणं गरजेचं आहे.

प्रेम दुसऱ्याकडे मागून मिळत नाही तर ते आपल्यात असावं लागतं तेंव्हा ते दुसऱ्यात जाणवत, या जागेवर जाणवत.

हा movie पहील्यावर्ती आयुष्याच्या प्रत्येक पैलू वरती आपोआप आपण विचार करायला लागतो. असा खूप सुंदर मेसेज या movie मधून आपल्याला भेटतो .

0 Shares

This Post Has 2 Comments

Leave a Reply