Charvak Book Overview:
चार्वाक कोण होता? Who was Charvak?
‘चार्वाक’ हाती घेतल तेव्हा,चार्वाकांबद्दल मनात बरेच पूर्वग्रह बाळगून होतो. पूर्वग्रह निर्मिले गेले.ते मी जन्माला आलेल्या धर्मातील विद्वान,पंडित,धर्मगुरू या पूर्वसुरींच्या कर्मकांडीय मुळात होते, आणि ते पद्धतशीरपणे माझ्यात झिरपण्याचे कार्य माझ्या धर्मातील साहित्याने, देवी-देवतांच्या पूजा पठणाने केले.
चार्वाक स्त्री पुरुष समानता Charvak Equality of Men and Women
चार्वाक स्त्री-पुरुष समानतेला महत्व देतो.तो ईश्वर, पूर्वजन्म ,पुनर्जन्म,मृत्यूनंतर जीवन हे यांना नाकारतो. वैदिक धर्म, ख्रिश्चन,इस्लाम यातील दैवी सिद्धांतांचे तो खंडन करतो.. श्रध्दा, भक्तिभाव, प्रश्न न विचारता वा विचार बाजूला सारून केलेल्या गोष्टी त्याला मान्य नव्हत्या. बुद्धाच्या दिव्यज्ञान प्राप्तीवर तो बोट ठेवतो, संघातील आणि संघाबाहेरील माणसाच्या वागणुकीत होणाऱ्या भेदभावला तो स्वीकारत नाही.. आणि या सगळ्या गोष्टींमुळे चार्वाक हा सर्व धर्मीयांकडून दुर्लक्षिला जातो. हिंदू, बुद्ध, ख्रिश्चन, इस्लाम हे धर्म राजसत्तेच्या कुबळ्या घेऊन मोठे झाले.
Scientologist Charvak:
चार्वाकाला अशी कोणतीच कुबळी मिळाली नाही. म्हणून विज्ञानवादी, धर्माची सांगोपांग चिकित्सा करणारा, तर्कावर विश्वास ठेवणार चार्वाक हा आपल्यापर्यंत पोहचला नाही. ही खंत लेखक व्यक्त करतात. या पुस्तकामध्ये ‘स्त्री आणि चार्वाक’ या मथळ्याखालील एक प्रकरण आहे. स्त्रीबद्दल चार्वाकाचे मूळ लिखाण स्पष्ट आढळत नाही पण त्याच्या एकूण समतावादी धोरणाने स्त्रीबद्दल त्याचे काय मत असेल? इथपर्यंत संशोधनाने पोहचणे शक्य झाले आहे.
पृथ्वीवरील सर्व धर्मांनी, अगदी प्राचीन काळापासून ते आजतागायत स्त्रियांना नाकारल आहे. तिला नेहमी पुरुषानंतर दुय्यम आणि तिय्यम स्थान धर्म देत आले आहेत. कोणत्याच धर्माच्या प्रमुखपदी आपल्याला स्त्री दिसत नाही. हिंदूमध्ये पूजा अर्चा करणारे पुजारी,महंत, पंडित, बुवा बाजी करणारे महाराज. इस्लाम धर्मात मुल्ला-मौलवी हे पुरुषच, ख्रिश्चन धर्मात तर पोप हे पदच पुरुषांसाठी राखीव.
कोणत्याच ऋचा ह्या स्त्रीयांनी लिहिलेल्या आढळत नाही. काही विदुषींचे नाव गार्गी आणि मैत्रेय यांच्यापुढे जात नाही. याचा उल्लेख लेखक प्रकर्षाने करतात. श्रद्धा ,पूजा, पाठ, यज्ञ हे स्त्रियांना नेहमी कमकुवत बनवत गेले. पुरुषसत्ताक पद्धतीने तिला चालाखीने आपल्या नियंत्रणात ठेवले. त्यात आपापल्या धर्मग्रंथांनी त्याला सहकार्यच केलेलं आपल्याला दिसून येत. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी त्या आपल्या भल्यासाठीच आहे. म्हणून ते स्त्रिया विनाप्रश्न पाळत असतात.
You will also like to read: The LUNCH BOX | MOVIE of UNCONDITIONAL LOVE
धर्माने जगात अनेक धर्मयुद्ध घडवून आणली कित्येकांचे बळी धर्माने घेतले आणि अजूनही घेत आहे . याकडे लक्ष वेधतांना लेखक चार्वाकांच्या तत्वज्ञानाकडे आशेचा किरण म्हणून बघतात.
आजचे राजकारणी पुन्हा धर्माची मंदिर, मस्जिदि बांधण्याच्या मागे लागेल असल्याने येथील विज्ञान बरेचसे विज्ञान पुस्तकात व काहीसेच जीवनात राहिले अशीच शक्यता मोठी आहे असे लेखक म्हणतात.
प्रबोधनाच्या काळात युरोपमध्ये अनेक वैज्ञानिक शोध, यंत्र, तंत्रज्ञान विकसित होत होते. परंतु भारतात जीवक, आर्यभट्ट सारख्या वैज्ञानिकांचा वारसा असतांना धर्म धर्म सुरू होते आणि इथेच विज्ञान मागे पडले. अध्यात्मिक प्रगतीच्या मागे धावतांना भौतिक प्रगतीत मात्र आपला देश मागे पडत राहिला.
असे अनेक नकारात्मक बिंदू अधोरेखित करत असतांना, शेवटाकडे येतांना मात्र हे सर्व चित्र बदलेल आणि भारत आपल्या जन्मनिष्ठतेकडून(देश,धर्म,पंथ जात) मूल्यनिष्ठतेकडे(न्याय,समता,बंधुता, नीती, माणुसकी, लोकशाही) मार्गक्रमण करेल,ज्याची सुरवात संविधानाने आधीच करवून दिली आहे. असा आशावाद व्यक्त होतांना दिसून येतो.या पुस्तकात वैदिक धर्म ते इतर धर्माच्या उत्पत्ती पासून सखोल लिखाण आणि त्याबद्दल चार्वाकांच्या विज्ञाननिष्ठ विचारांचा नेमका ताळमेळ बसतो का..? चार्वाकाचे त्याबद्दल नेमके काय मत होते याबद्दल उहापोहा केला आहे.
सर्वांनी वाचावं अस हे पुस्तक आहे. सुरेश द्वादशीवार सरांनी अगदी साध्या आणि सरळ भाषेत आणि अनेक उदाहरणे देऊन या पुस्तकाची मांडणी केली आहे. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा चिकित्सकपूर्ण दृष्टीकोण हे पुस्तक आपल्याला देते यात शंका नाही..
:लखन शोभा बाळकृष्ण.